Ad will apear here
Next
रोटरी क्लबतर्फे २५ शिक्षकांचा सत्कार


नाशिक :
नाशिक रोड परिसरातील शाळांमधील २५ आदर्श शिक्षकांना ‘रोटरी क्लब ऑफ नाशिक रोड’तर्फे नेशन बिल्डर्स अॅवॉर्ड देऊन सत्कार करण्यात आला.

या वेळी रोटरीचे अस्टिटंट गव्हर्नर कैलास क्षत्रिय, अध्यक्षा डॉ. रोचना शर्मा, उपाध्यक्ष अमित गांगुर्डे, सचिव स्नेहल गांगुर्डे, फिरदोस कपाडिया, हेमंत शिधये, सौमित्र दास, दिनेश शिंदे, मीनल येवलेकर, व्हिनस वाणी, प्रशांत बिसोई, फिरदोस कपाडिया, बाळकृष्ण साहू, अर्चना बिसोई, फरदीन कपाडिया, समिना साहू, ज्योत्स्ना शिधये आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. रोचना शर्मा यांनी रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली. दिनेश शिंदे यांनी सामाजिक उपक्रमांचे महत्त्व सांगितले. कैलास क्षत्रिय यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार झाला. समाजाच्या जडणघडणीत शिक्षकांचे योगदान लक्षणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. सत्काराच्या भेटवस्तू इव्हा मुखर्जी यांनी प्रायोजित केल्या होत्या.

या वेळी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. रोटरी क्लबशी संलग्न असलेला हा क्लब १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आहे. या क्लबसाठी मोहदरीच्या बेव्हज इंग्लिश स्कूलची निवड करण्यात आली. विद्यार्थिदशेपासून नेतृत्वगुण विकसित करून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची आवड निर्माण करणे हा क्लबचा उद्देश आहे.

इंटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष म्हणून रोहित आव्हाड, तर सचिव म्हणून संचिका पटेल यांची निवड झाली. समन्वयक म्हणून शाळेतर्फे सुनीता मधारू, तसेच रोटरी क्लबतर्फे सनिता वर्मा काम बघणार आहेत. 

कार्यक्रमावेळी ज्ञानेश शर्मा यांनी स्वागतगीत म्हटले. कुणाल शर्मा यांनी परिचय करून दिला. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZQHCE
Similar Posts
रोटरी क्लब नाशिक जिल्ह्यात पाणी नियोजनावर देणार भर नाशिक : ‘समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या रोटरीचे कार्य विश्वव्यापी होत असून, त्यासाठी अधिकाधिक सदस्य नोंदणी करणे ही बाब क्रमप्राप्त आहे. नाशिक जिल्ह्यात पाणी नियोजनावर रोटरीने आपले लक्ष केंद्रित केले असून, नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांना पाणीटंचाई बाराही महिने भासणार नाही, यासाठी रोटरी क्लब धडपडत आहे.
नाशिक कारागृहात कम्प्युटर लॅब; ही सुविधा असलेले देशातील पहिले कारागृह नाशिक : साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ पुस्तक जिथे लिहिले, त्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात अद्ययावत कम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. कम्प्युटर लॅब सुरू करणारे हे देशातील पहिलेच कारागृह ठरले आहे. मुंबईच्या समता फाउंडेशनच्या सहकार्याने ही लॅब सुरू झाली असून, कैद्यांना रोजगाराभिमुख शिक्षण दिले जाणार असल्याची
स्मृतिभ्रंश दिनानिमित्त नाशिकमध्ये जनजागृती नाशिक : स्मृतिभ्रंश दिनानिमित्त येथील युवा वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्मृतिभ्रंशासंदर्भात जनजागृती कार्यक्रम आयोजित केला होता. नाशिक रोडच्या सिग्नलवर, तसेच रस्त्यावर हातात पोस्टर घेऊन स्मृतिभ्रंशाची लक्षणे आणि कारणे यांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला.
नाशिक रोड येथे वाहन लोकार्पण सोहळा नाशिक : धोंगडेनगर प्रणित शिवशाही युवा फाउंडेशनतर्फे सतीश बिऱ्हाडे व पवन उगले यांच्या स्मरणार्थ रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांसाठी वाहन लोकार्पण सोहळा नुकताच आयोजित केला होता.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language